Ad will apear here
Next
मोहोळ यांची बिनविरोध निवड
पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांची बुधवारी निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने मोहोळ यांची बिनविरोध निवड झाले.याची घोषणा पिठासन अधिकारी आणि अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केली. 

सकाळी साडे अकरा वाजता महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पिठासन अधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणूकीस सुरूवात झाली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यास १५ मिनिटांची मुदत देण्यात आली त्या मुदतीत रेखा टिंगरे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. त्यानंतर पाटील यांनी मोहोळ यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. 

महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच इतर सर्व विषय समित्यांची अध्यक्षपदे भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहेत. त्यानुसार, एकूण 16 सदस्य असलेल्या स्थायी समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दहा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार सदस्य असणार आहेत. या शिवाय कॉंग्रेस-शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य असणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HYVJBA
Similar Posts
विधानसभा निवडणूक निकाल : भाजप-सेनाच आघाडीवर; असे आहे २८८ मतदारसंघांतील चित्र मुंबई : महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया सध्या सुरू असून, दुपारी पावणेतीन वाजता भारतीय जनता पक्ष ९३ जागांवर आघाडीवर होता, तर आठ जागांवर विजयी झाला होता. शिवसेनेने ५० जागांवर आघाडी मिळवली होती, तर आठ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस ५५, तर काँग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे
नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड मुंबई : शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. गोऱ्हे या विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.
महापालिकेकडून तत्परतेने मिळालेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा पुणे : पुराचा फटका बसलेल्या नदीकाठच्या भिडे पूल परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेतर्फे रोख रक्कम आणि अन्नधान्याची मदत देण्यात आली आहे. शासकीय व प्रशासकीय यंत्रणेकडून तत्परतेने मिळालेल्या या मदतीमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
विश्रांतवाडी परिसरात 'जयभीम वायफाय'ची सुविधा! पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १, विश्रांतवाडी या परिसरामधून राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या 'रेखाताई चंद्रकांत टिंगरे' निवडून आल्या आहेत. त्यांनी आपल्या पदाच्या कार्यभाराला सुरुवात केली असून, विश्रांतवाडी या परिसरात नागरिकांनसाठी सुविधेचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language